Anil Deshmukh । अनिल देशमुखांमागे कारवाईचा ससेमिरा सुरूच; १२ ठिकाणांवर छापेमारी

Anil Deshmukh । अनिल देशमुखांमागे कारवाईचा ससेमिरा सुरूच; १२ ठिकाणांवर छापेमारी

Published by :
Published on

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.आता देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.

१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर,अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे. अशा वेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा सत्य उघड करण्यातील अडथळा ठरू शकतो. त्यामुळे सीबीआयला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com