राज्याचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh
यांना मोठा धक्का

राज्याचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना मोठा धक्का

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केलं आहे.

2021 साली सीबीआयचा अंतर्गत अहवाल लीक झाल्याच्या प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी कथित लाच दिली होती. मुलगी पुजावर डागा यांना मदत केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

तपासामध्ये अनिल देशमुख यांच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचा सीबीआयने अंतर्गत रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. हा रिपोर्ट 29 ऑगस्ट 2021 मध्ये प्रसार माध्यमांमध्ये लीक झाला होता. आता सप्लीमेंट्री चार्जशीट मध्ये अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांचा या लीक प्रकरणात सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com