Sambhaji Nagar
Sambhaji NagarTeam Lokshahi

औरंगाबादचे नाव 'छत्रपती संभाजीनगर' करण्यास केंद्र सरकारची मंजुरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत, मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार.
Published by :
Sagar Pradhan

अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यानंतर आज केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामंतराला मंजुरी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’असेही फडणवीस यांनी म्हटले.  

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com