Breaking News
महाराष्ट्र
Breaking News : मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाला आव्हान; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News) नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या निवडणुकांसाठी मतदान 20 डिसेंबरला होणार आहे आणि मतमोजणी 21 ला होणार आहे.
मात्र या निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्याने या निकालाला राजकिरण बर्वे आणि एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
त्यांनी यावर लगेच मतमोजणीची मागणी केली असून याचिकेवर आज सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून यामध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
