Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

आयएमडीच्या अंदाजानुसार,उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडेल.
Published by :
Dhanshree Shintre

आयएमडीच्या अंदाजानुसार,उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडेल. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन भागातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीसह मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

याशिवाय उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, बिहार आणि ओडिशाच्या विविध भागात 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान गडगडाट आणि विजांचा कडकडाटसह गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी जम्मू-काश्मीर-लडाखमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com