“…नाहीतर संजय राऊत म्हणतील सीबीआय माझ्या सांगण्यावरून चालते”

“…नाहीतर संजय राऊत म्हणतील सीबीआय माझ्या सांगण्यावरून चालते”

Published by :

अनिल देशमुख यांच काल क्लीन चिट दिली म्हणून  ढोल वाजवून फुटले असतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. सीबीआयने संध्याकाळी थप्पड लावल्यानंतर चिडीचूप बसले. अशा पुड्या सोडणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. मात्र यावर मी काही मत मांडल्यास संजय राऊत, दादांच्या सांगण्यावरून सीबीआय चालते, असा टोला लगावतील, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

आमच्या पार्टीमध्ये कोण चूक करेल किंवा मी करेल त्याच्यावर कारवाई होईल. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. नाथा भाऊंनी काही केले नाही तर छळण्याचा काय प्रश्न आहे, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. एका क्षणाला ईडी आणि सीबीआय थांबतील. खोटं बोल रेटून बोल ट्रेंनिग क्लासेस चालवेत. सरकार जेव्हा जाईल त्यावेळी त्याच्याकडे ट्रेंनिग लावावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com