महाराष्ट्र
चंद्रकांत पाटलांनी विधानाबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे, अन्यथा…
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी ब्रिगेड यांनी ही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्रकांत पाटलांनी जे विधान केलेल आहे ते बालिश विधान केलेलं असून बहुजन महापुरुषांना जाणीवपूर्वक जाती-धर्मात अडकवून संकुचित करण्याचे काम हे आर. एस. एस. एसचे षडयंत्र काही नवीन नाही असे स्पष्टपणे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते यांनी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले.
अशा प्रकारची विधान करून जातीय विद्वेष निर्माण करण्याचं काम आर. एस. एसने सातत्याने केले असल्याचा आरोप ही डॉ. शिवानंद भानुसे यांनी केला. चंद्रकांत पाटलांनी या विधानाबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे. अन्यथा संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने धडा शिकवेल.असा संभाजी ब्रिगेड कडून इशारा देण्यात आला.