चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा बोलबाला

चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा बोलबाला

शिवसेना ठाकरे गटाला रामपूर मध्ये यश तर सास्ती मध्ये भाजप
Published by  :
Team Lokshahi

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचा बोलबाला दिसून आला आहे. विशेष म्हणजे आठही ग्रामपंचायती काँग्रेस आमदारांच्या क्षेत्रात होत्या. राजुरा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला रामपूरमध्ये यश मिळाले तर सास्तीमध्ये भाजपने सत्ता मिळविली आहे.

आर्वी गावात काँग्रेसने सत्ता राखली असून वरोरा तालुक्यातील सालोरी येथे काँग्रेस तर ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे अपक्षाने बाजी मारली.

आज सकाळपासून मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते आणि उमेदवारांची गर्दी दिसून आली. रामपूर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर राजुरा तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com