Chandrashekhar Bawankule : Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनात मंत्री बावनकुळे मध्यस्थी करण्याची शक्यता
थोडक्यात
शेतकरी आंदोलनात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी करणार?
सरकारकडून बावनकुळे संवाद साधण्याची शक्यता
चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून बावनकुळेंवर जबाबदारी देण्याची शक्यता
(Chandrashekhar Bawankule) बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचा ट्रॅक्टरसह लाँग मार्च आता नागपूरमध्ये पोहचला आहे. नागपूर वर्धा महामार्गावर ट्रॅक्टरने चक्का जाम करण्यात आला. रात्री रस्त्यावर ठिकठिकाणी चुली पेटल्या.
शेतकऱ्यांनी संपूर्ण संसार रस्त्यावर मांडल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला असून नागपूर वर्धा महामार्गावर ठिय्या असून वाहतूक ठप्प आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडूंच्या आंदोलनात मंत्री बावनकुळे मध्यस्थी करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बच्चू कडूंकडून आलेल्या विधानानंतर सरकारकडून बावनकुळे संवाद साधण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांनी काल बच्चू कडूंसोबत बैठक लावली होती मात्र
बच्चू कडू बैठकीस अनुपस्थित राहिल्याने ही बैठक रद्द करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आज सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
