Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं, त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा काही योग्य नाही

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं, त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा काही योग्य नाही

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत शरद पवार बोलत होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत शरद पवार बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं, खाली कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिंता वाटते आहे. असे शरद पवार म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावरचं बोलत आहेत हे काही चांगलं नाही. महाराष्ट्राचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं. त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राची जनता दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही, कधी होती नाही, कधी होणार नाही. पण काही लोक समाजसमाजामध्ये तेढ निर्माण करणं, असं काही आंदोलन तयार करणं ज्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होईल. त्यातून मग महाराष्ट्राला विचलीत ठेवण्याचे काम काही लोक करत आहेत.

यासोबतच बावनकुळे पुढे म्हणाले की, शरद पवार साहेबांना विनंती आहे की, असं जे लोक आहेत जातीजातीमध्ये वाद निर्माण करणारे यामध्ये त्यांनी जरा पुढाकार घ्यावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही. पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याचा भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा किंवा पुढच्या काळात दंगली घडवण्याची भविष्य हे कुठल्या कारणावरुन केलंय आणि त्यांचा मनात काय हे मला माहित नाही. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com