मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन तास ब्याॅक, वाहतुकीत बदल

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन तास ब्याॅक, वाहतुकीत बदल

Published by :
Published on

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (आज) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत रस्ते विकास महामंडळाकडून काही कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या दोन मार्गिका बंद करण्यात येणार असून एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ओव्हरहेड गॅन्ट्री स्ट्रक्चरवर फलक (व्हॅरीएबल मेसेज बोर्ड) बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अवजड आणि माल वाहतूक करणारी वाहने किलोमीटर ५६.१०० येथे थांबविण्यात येणार आहेत. हलकी तसेच अन्य प्रवासी वाहनांना एका मार्गिकेवरून जाण्याची मुभा देण्यात आली आहे. मंगळवारी (२८ डिसेंबर) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार असून वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाकडून करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com