Thane
महाराष्ट्र
Thane : ठाण्यात चरस तस्कराला बेड्या; 5 कोटी 50 लाखांचे चरस जप्त
ठाण्यात चरस तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thane ) ठाण्यात चरस तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी आरोपीकडून 5 कोटी 50 लाखांचे चरस जप्त केले असून आरोपी एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता? हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवण्यात आले आहे.
या प्रकरणी आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनवरच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 505 ग्रॅम वजनाचे दहा पाकीट चरस मिळाल्याची माहिती मिळत आहे.
Summery
ठाण्यात चरस तस्कराला बेड्या
5 कोटी 50 लाखांचे चरस जप्त
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
