Chhagan Bhujbal : ओबीसींवर अन्याय केला जात आहे का? की मराठ्यांना फसवले जात आहे?

Chhagan Bhujbal : ओबीसींवर अन्याय केला जात आहे का? की मराठ्यांना फसवले जात आहे?

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. 

याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याने हरकती पाठवाव्या. जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल. माझे स्वतःचे मत सगे सोयरे कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही. EWS १० टक्क्यांत आरक्षण मिळत होते ते आता मिळणार नाही. ५० टक्क्यात तुम्ही खेळत होतात. जात जन्माने माणसाला मिळत असते. उद्या दलितांमध्ये कोणी पण घुसेल आदिवासीत घुसेल. ओबीसींवर अन्याय केलं जात आहे का? की मराठ्यांना फसवले जात आहे.

मराठा समाजाला शिक्षण मोफत का द्यायचे. ओबीसी, दलीत, आदिवासी ओपन सगळ्यांना द्या मग एकालाच कशासाठी? तूर्त असं वाटतंय मराठा समाजाचा विजय झाला पण मला तसं वाटतं नाही. झुंडशाहीने असे कायदे बदलता येत नाही . मंत्री पदाची शपथ घेत असतांना आम्ही शपथ घेतली आहे. आम्ही सुद्धा काही हरकती मागविल्या आहेत . जे वकील आहे त्यांनी अभ्यास करून तातडीने पाठविण्यासाठी प्रयत्न करावे. सगेसोयरे कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही. मराठा समाजाला सुद्धा निदर्शनास आणून द्यायचे आहे .

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com