Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : मोठी बातमी, छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज पाहायला मिळालं होतं. यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती.

मुंबईत राजभवन येथे हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार असून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी याबाबत परिपत्रक देखील जारी केलं असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी समारंभ आयोजित केल्याची माहिती देण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं होते. त्यानंतर या जागेवर छगन भुजबळांची यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com