Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये संशयित आरोपी अमोल खोतकरचा एन्काऊंटर; कुटुंबाचे पोलिसांवर गंभीर आरोप

(Chhatrapati Sambhajinagar ) वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी झालेल्या दरोड्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरच्या एन्काउंटरमुळे राज्यभर खळबळ माजली
Published by :
Team Lokshahi
Published on

(Chhatrapati Sambhajinagar ) वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी झालेल्या दरोड्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरच्या एन्काउंटरमुळे राज्यभर खळबळ माजली असतानाच या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. अमोलच्या कुटुंबीयांनी हा एन्काउंटर 'सुपारी घेऊन केलेला खून' असल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची जोरदार मागणी केली आहे.

वडगाव कोल्हाटी परिसरात रात्री झालेल्या गोळीबारात अमोल खोतकरचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मते, अमोलने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

अमोलची बहीण रोहिणी खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केला. "राज्यात न्याययंत्रणा आहे, आरोपीला अटक करून न्यायालयात उभे करणे हेच योग्य होतं. पोलिसांनी मारून टाकण्याचं काम केलं नाही पाहिजे. हा खून सुपारी घेऊन केला गेला आहे," असे तिने सांगितले.

यासोबतच अमोलचे वडील बाबुराव खोतकर यांनीही पोलीस कारवाईवर संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली. "इतक्या गोळ्या छातीवर कशा लागल्या? नेमकं काय झालं याचा शोध सीबीआयने घ्यावा," अशी मागणी करत त्यांनी इन-कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com