Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज प्रकरण; भंगार व्यावसायिकाची 8 बँक खाती गोठवली

औषधी कंपनीच्या वेस्टेजमधून मेफेड्रॉनची तस्करी
Published by :
Team Lokshahi
Published on

( Chhatrapati Sambhajinagar ) प्रसिद्ध मायलॉन औषधी कंपनीच्या कचऱ्यातून मेफेड्रॉन (एमडी) सारख्या महागड्या रासायनिक पावडरची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड झाल्यानंतर, या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत भंगार व्यावसायिक बबन खान आणि त्याच्या कुटुंबीयांची 8 बँक खाती गोठवली आहेत. ही माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

शुक्रवारी पोलिसांनी चार प्रॉडक्शन मॅनेजरचे जबाब नोंदवले, तर मायलॉन कंपनीच्या प्रकल्प प्रमुखाला कागदपत्रांसह चौकशीसाठी शनिवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. एमडीसारख्या घातक ड्रग्जची तस्करी ही मायलॉनसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या कचऱ्यातून होत असल्याचे उघडकीस आल्याने औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे.

सहायक निरीक्षक गीता बागवडे आणि मनोजकुमार शिंदे यांच्या पथकाने शनिवारी साजापूर परिसरातून मायलॉन कंपनीच्या वेस्टमधून भरलेले दोन ट्रक पकडले, ज्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेली रासायनिक पावडर सापडली. या पावडरचा वापर एमडी ड्रग्जसाठी केला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी भंगार व्यावसायिक बबन खान, त्याचे दोन पुत्र कलीम आणि सलीम खान, तसेच ट्रक चालक शफीफुल रहमान तफज्जुल हुसैन आणि राज अजुरे यांना अटक केली आहे. सध्या हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com