Chhatrapati Sambhajinagar
महाराष्ट्र
Chhatrapati Sambhajinagar : 'समृद्धी'च्या टोलनाक्यावर गोळीबार; एकजण गंभीर जखमी
'समृद्धी'च्या टोलनाक्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
(Chhatrapati Sambhajinagar ) 'समृद्धी'च्या टोलनाक्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली आणि या झटापटीत अचानक पिस्तूलमधून गोळीबार झाला.
या झटापटीत एका कर्मचाऱ्याच्या हातात असलेल्या पिस्तूलमधून गोळी सुटून ती थेट दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या पोटात घुसली. जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गोळीबारानंतर दुसरा कर्मचारी फरार झाला आहे.
फरार कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 2 पथके पाठविली असून हा सर्व प्रकार शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडल्याची माहिती मिळत आहे.