Justice Bhushan Gavai : देवेंद्र फडणवीसांसमोरच सरन्यायाधीश गवईंकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक, म्हणाले...
(Justice Bhushan Gavai ) नागपूरमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि यावेळी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच उद्धव ठाकरेंचे भरभरुन कौतुक केले.
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, 'विधी विद्यापीठाचे 2016 साली भूमिपूजन झाले तेव्हा देवेंद फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळात विद्यापीठाला भरपूर निधी दिला. त्यानंतर 2019मध्ये त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद होते. या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.
त्यावेळी कोरोनाच्या काळात देखील उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाला निधीची कमतरता होऊ दिली नाही. असे न्या. गवई यांनी ठाकरे यांचे कौतुक केले. यासोबतच ते पुढे म्हणाले की, विधी विद्यापीठाचे भूमिपूजन झाले तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, दुसऱ्या वेळी ते विरोधी पक्ष नेता होते, त्यानंतर तिसऱ्या वेळी ते उपमुख्यमंत्री म्हणून विद्यापीठ कार्यक्रमात उपस्थित राहिले, आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमात उपस्थित आहेत, असे ते म्हणाले.