Devendra Fadnavis : महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत असून अनेक दिवसांपासून महायुतीमधील कुरबुरी आपल्याला पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'चे आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सगळ्या आमदारांसोबत चर्चा करणार असून आज सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.
आगामी निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यासोबतच विधिमंडळ कामकाजासंदर्भात देखील चर्चेची शक्यता आहे. या 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'वर आता चर्चा रंगल्या आहेत.
Summery
महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'
उद्या सकाळी 8.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा
आगामी निवडणुकांसंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता
