Devendra Fadnavis : नागपूरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 3 सभा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Devendra Fadnavis) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात असणार आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात 3 सभा होणार आहेत.
भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात जाहीर सभा आयोजित केल्या असून पहिली सभा संध्याकाळी 7 वाजता बोरगाव चौकात, दुसरी सभा रात्री 8 वाजता तिरंगा चौक, सक्करदरा मध्ये पार पडेल, तर तिसरी सभा रात्री 9 वाजता त्रिमूर्ती नगर चौकात पार पडेल. यासोबतच जळगाव शहरात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असून रोड शो होणार आहे.
Summary
नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 3 सभा
संध्याकाळी 7 वाजता सभांना होणार सुरूवात
जळगावात महायुतीचा रोड शो होणार
