Breaking News
महाराष्ट्र
Breaking News : निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News) नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. प्रचार देखील जोरात करण्यात आला आहे. यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले.
याच निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. MSRDC च्या कार्यक्रमाला दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र येण्याची दाट शक्यता असून काल सह्याद्री येथे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीला देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले होते. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान या दोघांमध्ये संवाद होतो का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार असून या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
