Devendra Fadnavis - Uday Samant : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis - Uday Samant) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 ते 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असणार आहेत. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे.
या परिषदेसाठी जगभरातील विविध देशांमधील, राज्यांतील प्रतिनिधींबरोबरच मोठमोठ्या नामांकित कंपन्यांही सहभागी होणार आहेत.‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जाणार आहेत.
आठ दिवसांचा हा दौरा असणार असून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणण्याच्या हेतूने हा दौरा महत्त्वाचा आहे.
Summary
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या गुंतवणूक परिषदेला फडणवीस आणि सामंत उपस्थित राहणार
आठ दिवसांचा हा दौरा असणार
