Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रामदास आठवले यांना फोन; कारण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत असून बैठकीत जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे.
जागावाटप लवकर पूर्ण करण्यासाठी विनंती केली असल्याची माहिती मिळत असून भाजपाच्या कोट्यातून रामदास आठवले यांच्या रिपाईला जागा मिळण्याची शक्यता आहे.
बहुतेक जागावाटप पूर्ण, आता उर्वरित लवकर पूर्ण करावे, अशी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विनंती केली असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रामदास आठवले यांना फोन
जागावाटप लवकर पूर्ण करण्यासाठी विनंती
भाजपाच्या कोट्यातून रामदास आठवले यांच्या रिपाईला जागा
