Devendra Fadnavis : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना जिल्हा दौऱ्यावर; भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ घेणार जाहीर सभा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Devendra Fadnavis) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता शहरातील मामा चौक मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे. या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना जिल्हा दौऱ्यावर
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता जाहीर सभा
सभेच्या माध्यमातून भाजप शक्तिप्रदर्शन करणार
