Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका; आज 'या' ठिकाणी होणार जाहीर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभा घेणार आहेत. सोलापूर, पिंपरी आणि मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
बीड जिल्ह्यात आज श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर वामन भाऊ यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून भाविक व अनुयायी मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे. या सभांमधून मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहेत.
Summary
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले
मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका
सोलापूर, पिंपरी आणि मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार
