Devendra Fadnavis
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी; पनवेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून सभांचा धडाका पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज पनवेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी 3 वाजता सभेचं आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री फडणवीस सभेतून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी
पनवेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा
दुपारी 3 वाजता सभेचं आयोजन
