Breaking News
महाराष्ट्र
Breaking News : वर्षावर रात्री मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांमध्ये तब्बल 2 तास बैठक
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News ) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन केलं जाताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षावर काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली. बैठकीत तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळत असून बावनकुळे, रवींद्र चव्हाण, उदय सामंतही उपस्थित होते. या बैठकीत मनपा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
Summary
वर्षावर रात्री महत्त्वाची बैठक पार
फडणवीस,शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक
बैठकीत तब्बल 2 तास बैठकीत खलबतं
