Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका; मुंबईत आज 'या' ठिकाणी होणार जाहीर सभा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभा होणार आहेत.
मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज चार जाहीर सभा होणार असून भाईंदर, वसई, चेंबूर आणि घाटकोपरमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या सभेत ठाकरे बंधूंना काय उत्तर देणार ? यासोबतच काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज चार जाहीर सभा
मिरा - भाईंदर, वसई, चेंबूर आणि घाटकोपरमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार
आजच्या सभेत ठाकरे बंधूंना काय उत्तर देणार ? याकडे असेल लक्ष
