महाराष्ट्र
Devendra Fadnavis : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट; उद्या मुंबईतील 100 हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट असणार आहे.
यामध्ये मुंबईतील 100 हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. 24 नोव्हेंबरला 7500हून अधिक विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार असून वरळी डोम येथे युवकांसाठी युथ कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Summery
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट
मुंबईतल्या 100 हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद
24 नोव्हेंबरला विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
