कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका… मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत?
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा कमालीचा वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात सापडलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित सापडले आहेत. त्यामुळे यंत्रणांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल्स, उपहारगृह आणि मॉल्सच्या प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला आहे.
कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावेळी मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स, उपहारगृहांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी समाजातील सर्व घटकांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा त्यांनी वर्तवली आहे.
"लॉकडाऊन लागू करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे. पण मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं अशा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आम्हाला कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका", असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.