लस घेऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

लस घेऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Published by :
Published on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाचीलग्न झाली आहे. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. त्यामुळे प्रतिबंधक लस घेऊन सुद्धा रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण कशी झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. तसेच त्या सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतर त्या आता पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

दरम्यान याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढलीय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com