चिपी विमानतळाच्या पाहणीसाठी संसदीय अंदाज समिती सिंधुदुर्गात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना या विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्य सरकारकडून हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टीच्या दुरुस्तीचे निर्देश DGCA ने दिले होते. त्यामुळे डीजीसीआयने विमानतळावरून विमान उड्डाण करायला अद्यापही परवानगी दिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने विमानतळाची पाहणी करतानाच विमानतळ बांधकाम कंपनी आयआरबीचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. DGCA चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे. चिपी विमानतळाला DGCAने अद्यापही परवानगी दिलेली नाही. ही समिती आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत.