महाराष्ट्र
“100 गुन्हे दाखल करा, हम जितेंगे.. और भी लढेंगे”
राष्ट्रवादीचे पदाधिकारी मेहबुब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले. अद्याप या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शेख यांनी सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचा बलात्कारी मेहबुब शेख याने माझ्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल केला आहे. असे 100 गुन्हे दाखल करा, हम जितेंगे और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाउपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चिपळूण दौऱ्यात दिली आहे.