महाराष्ट्र
‘उनकी जान खतरे मे’; चित्राताई वाघ यांनी उडवली गृहराज्यमंत्र्यांची खिल्ली
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले आहे. शंभुराज देसाई यांचा दोन अज्ञात व्यक्तींकडून पाठलाग होत असल्याची घटना घडली. या घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा दोन अज्ञात व्यक्तींकडून पाठलाग होत असल्याच्या घटनेवर बोलताना चित्राताई वाघ यांनी खिल्ली उडवत "उनकी जान खतरे मे" असे त्यांनी म्हटले.तसेच जर राज्याचा गृहराज्यमंत्रीच सुरक्षित नसेल तर आम्हाला केंद्राला प्रोटेक्शन देण्याची विनंती करावी लागेल असा खोचक टोला शंभूराज देसाई यांना चित्रा वाघ यांनी लगावला.