palghar
palgharteam lokshahi

Palghar : सिनेस्टाईलने पाठलाग करून चोरट्यांना केले जेरबंद

चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना सिनेस्टाईल जेरबंद करण्यात स्थानिकांच्या मदतीने वाडा पोलिसांना यश आले आहे.
Published by  :
Team Lokshahi

प्रवीण बाबरे|पालघर: चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना सिनेस्टाईल जेरबंद करण्यात स्थानिकांच्या मदतीने वाडा पोलिसांना यश आले आहे. वाडा तालुक्यात मेट या गावात असलेल्या मेटाफिल्ड कॉईल प्रायव्हेट लिमिटेड या बंद कंपनीत हे चोरटे गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीतील लोखंड चोरण्यासाठी आले होते. याची माहिती स्थानिक नागरिक आणि पोलिसांना लागली. मात्र काही तरूण पोलिसांसोबत कंपनीकडे येत असल्याची चाहूल लागतात पाचही चोरट्यांनी पाय वाटेने पळ काढला.

दीड ते दोन किलोमीटरचा पळ काढल्यावर चोरट्यानी थेट नदीत उड्या मारल्या. यानंतर त्यांचा पाठलाग करणाऱ्या स्थानिक तरुण आणि पोलिसांनीही नदीत उड्या टाकत या चोरट्यांच्या अखेर मुस्क्या आवळल्या आहे.

या प्रकरणात वाडा पोलिसांनी रवाब शहा , मेरानुर शहा , वैभव जाधव , अब्दुल शहा , चिराग पाटील अशा पाच आरोपींना अटक केला आहे . सिने स्टाईलने पाठलाग करून चोरट्यांना जेरबंद केल्याने स्थानिक तरुण आणि पोलिसांच सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com