इगतपुरीत ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट; दोन महिला उमेदवारांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी

इगतपुरीत ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट; दोन महिला उमेदवारांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी

राज्यात आज एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. अशातच, नाशिकमधील इगतपुरी येथून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

नाशिक : राज्यात आज एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. अशातच, नाशिकमधील इगतपुरी येथून धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोन महिला उमेदवारांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समजत आहे.

इगतपुरीत ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट; दोन महिला उमेदवारांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी
राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान; 20 हजारांहून अधिक जागांसाठी मतदान

माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यात 16 ग्रामपंचायतचा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या रणधुमाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच रात्री उशिरा धारगाव ग्रामपंचायतच्या दोन महिला उमेदवार सदस्यांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी घोटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पार पडत आहे. ४३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदाच्या २०० तर ४४ ठिकाणी थेट सरपंच पदाची लढत होत आहे. तर, ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com