Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : 'या' महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

(Devendra Fadnavis ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Devendra Fadnavis ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

सांगलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येणार आहे. ज्यावेळी जिल्हा परिषद ही होईल, महानगरपालिका ही होईल, नगरपालिकाही होतील.

साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील. कदाचित जिल्हा परिषद, नगरपालिका एकत्रित होतील किंवा त्यामध्ये अंतर असेल. त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका होतील. त्यामुळे आपल्याला तयारी केली पाहिजे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com