CM Eknath Shinde on Maratha Reservation : आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतला

CM Eknath Shinde on Maratha Reservation : आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतला

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. 

याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सर्व देशाचं लक्ष मराठा आंदोलनाकडे होते. मराठा समाजानं शांततेत आंदोलन केलं. मराठा समाजाने एकजूट कायम ठेवली. जरांगेच्या नेतृत्वात शांततेत आंदोलन यशस्वी. घेतलेली शपथ पूर्ण केली. मलाही मराठ्यांच्या वेदनांची कल्पना. आरक्षणाबाबत दिलेला शब्द मी पूर्ण केला. न्याय हक्क मागताना मराठा समाजाने कुणालाही त्रास होऊ दिला नाही.

आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतला. मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण. तुम्ही जी काळजी घेतली त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून धन्यवाद देतो. मी पण शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मला ही दुख व वेदना यांची कल्पना आहे. शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे. सर्व समाजाला न्याय देण्याचे निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाचा संघर्ष आहे. अनेक नेत्यांना मोठे मराठा समाजाने केले. तर अनेकांना नेते केले. आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. तुमच्या विजयाचा दिवस आहे. गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मी आपल्या प्रेमापोटी येथे आलो. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. मराठवाड्यात कुणबी नोंद दिली जात नव्हती.

सरकारची इच्छा शक्ती देण्याची आहे. आपले सरकार देणारे आहे, घेणारे नाही. कुणाच्या हक्काचे नाही घ्यायचे. पण हक्काचे मिळाले पाहिजे. सरकारने तेच केले. सर्वसामान्य माणूस ज्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्याच्या पाठिशी तुम्ही उभे राहिलात. जेव्हा सर्वसामान्य माणूस आंदोलन करतो. तेव्हा त्या आंदोलनाला एक वेगळेपण मिळते. ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती दिल्या जातील. एक मराठा लाख मराठा आहे. तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही संयमाने जे आंदोलन केले त्याबद्दल सर्वांना न्याय देण्याचे काम आपण करू. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde on Maratha Reservation : आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतला
मराठा आंदोलनाच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटलांची सभेतून पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com