OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक
ओबीसीसह अन्य आरक्षणावर चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शुक्रवारी सर्व राजकीय पक्षांची बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. . या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता सह्याद्री गेस्ट हाउसवर ही बैठक होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर यातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी अन्य आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, राज ठाकरे, राजू शेट्टी यांच्यासह २७ नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.