‘पाकिस्तान जनता पार्टी’, ‘हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो’, जनाबसेनेवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

‘पाकिस्तान जनता पार्टी’, ‘हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो’, जनाबसेनेवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Published on

पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं हे पाहिलं आहे. आम्ही पाकिस्तान जनता पार्टी, हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो. तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तर आम्ही कमरेचं सोडणार नाही पण तुमचं उघडं पडलेलं जनतेला दाखवून देऊ," असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी दिले आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. विरोधी पक्षांनी शिवसेना जनाबसेना असल्याची टीका केली होती. या वक्तव्याचा आता मुख्यमंत्र्यांनी समाचार घेत भाजपवर शरसंधान केले. "शिवसेनेला जनाबसेना म्हटलं जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. आत डाव पहा…काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं शक्य नाही," असं उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) स्पष्ट केलं.

मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का?

जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? आधी हिंदुत्व काय ते समजून घ्या," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तुमची सत्तेची स्वप्नं आम्ही चिरडून टाकली म्हणुन आम्ही मुस्लीमधार्जिणी असू तर मोहन भागवतांनी काय सांगितलं आहे ते ऐका असं सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांची काही वक्तव्यं वाचून दाखवली. तसंच आरएसएसला मुस्लीम संघ की राष्ट्रीय मुस्लीम म्हणायचं का? असंही त्यांनी विचारलं.

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा भ्रम निर्माण केला जात आहे. एक दिवस कदाचित हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असंही म्हणायला कमी करणार आहे. हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला असंही म्हणतील पण तो त्यांचा मानसिक आजात असेल. आपला तो बाब्या आणि दुसरा तो गुंड अशी त्यांची मानसिकत झाली असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com