पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर CNG, PNG सुद्धा महागले

पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर CNG, PNG सुद्धा महागले

Published by :
Published on

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरवाढीमुळे भारतात गॅसचे दर वाढले आहेत.

महानगर गॅस लिमीटेडने पीएनजी आणि सीएनजीच्या किंमतीत तात्काळ प्रभावाने 2 रुपयांची वाढ केली आहे. पुरवठा किंमतीत तीव्र वाढ लक्षात घेता औद्योगिक सीएनजी 2 रुपये प्रति किलो आणि घरगुती पीएनजी 2 प्रति एससीएम वाढल्याची माहिती एमजीएलने दिली आहे.

दरम्यान, या दरवाढीनंतर मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत टॅक्स समाविष्ट करून स्लॅब 1 ग्राहकांसाठी सीएनजी 54.57 रुपये/किलोग्रॅम आणि पीएनजी 32.67 रुपये/एससीएम आहे, तर स्लॅब 2 ग्राहकांसाठी 38.27 रुपये/एससीएम होईल.

दरवाढीची काही मुख्य कारणे –

अमेरिकेत नॅच्युरल गॅसचं उत्पादन कमी झाल्यामुळे पुरवठा कमी आहे, चीनने या नॅच्यरल गॅसच्या आयातीत दुप्पट वाढ केली आहे, तर कोळशाच्या किंमती वाढल्यानेही नॅच्यरल गॅस महागला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com