CNG Supply Disrupted
CNG Supply Disrupted

CNG Supply Disrupted : सीएनजी पुरवठा ठप्प; शहरातील 164 पंप बंद, वाहतुकीवर परिणाम

'गेल'च्या मुख्य गॅसपुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( CNG Supply Disrupted) गेलच्या मुख्य गॅसपुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झाला. याचाच परिणाम आता वाहतुकीवर झाले आहे. सीजीएस वडाळा येथे गॅसपुरवठा थांबल्यामुळे आणि एमजीएल वाहिनी जोडणीमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही सीएनजी पंप सोमवारी बंद ठेवण्यात आले होते.

महानगर गॅसच्या पाइपलाइनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका आता मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हजारो वाहनचालकांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम कॅब, टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर झाला.

मंगळवारी दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून तोपर्यंत वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे. मुंबई परिसरातील 164 सीएनजी पंप बंद होते. दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असून १८ नोव्हेंबर दुपारपर्यंत गॅसपुरवठा व्यवस्थित होणार असल्याची शक्यता आहे.

Summery

  • सीएनजी पुरवठा ठप्प, मुंबईकरांचे हाल

  • टॅक्सी-रिक्षा वाहतुकीवर परिणाम

  • मुंबईतील 164 सीएनजी पंप बंद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com