कोळसा उत्पादनानं पार केला १ अब्ज टनचा टप्पा; आयातीवरचं अवलंबित्व कमी होणार

कोळसा उत्पादनानं पार केला १ अब्ज टनचा टप्पा; आयातीवरचं अवलंबित्व कमी होणार

गेल्या काही वर्षात वीजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. कोळशाचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने देशात अनेकदा वीज टंचाईची समस्या निर्माण झाली होती.
Published by :
shweta walge

भारत हा जगातील प्रमुख कोळसा उत्पादक देशांपैकी एक आहे. भारताने मागील वर्षाच्या तुलनेत कोळसा उत्पादनाला २५ दिवसांच्या फरकाने मागे टाकले आहे.

गेल्या काही वर्षात वीजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. कोळशाचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने देशात अनेकदा वीज टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कोळसा आयात करावा लागायचा. मात्र, आता दिलासा दोणारी बातमी समोर आली असून मागील काही महिन्यांपासून भारतात कोळशाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. भारताने कोळसा उत्पादनात १ अब्ज टनाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोळसा आयातीवरचे अवलंबित्व कमी होणार आहे.

भारत हा जगातील कोळसा उत्पादक देशांपैकी एक आहे. २०२०-२१ मध्ये कोळशाचे उत्पादन ७१६.०८ दशलक्ष मेट्रिक टन होते. त्यानंतर आता चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने मागील वर्षाच्या तुलनेत ९३७.२२ दशलक्ष टन कोळसा उत्पादन करत २५ दिवसांच्या फरकाने मागे टाकले आहे. कोळसा उत्पादनात वाढ आणि पुरवठ्यातील कमतरता, यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरकार काम करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com