Maharashtra Local Body Election : राज्यात 'या' तारखेपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची उद्या बैठक
थोडक्यात
राज्यात 10 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता
राज्य निवडणूक आयोगाची उद्या बैठक
अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेऊन निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर करणार
(Maharashtra Local Body Election) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल महाराष्ट्रात लवकरच वाजणार आहे.
यातच राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक बोलावली असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा 10 नोव्हेंबरपूर्वी जाहीर होऊ शकते अशी माहिती मिळत आहे.
सर्व तयारीचा आढावा घेऊन पुढील 10 दिवसांत निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर केला जाईल. आयोगाकडून संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात नाही. या संदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
