अहमदनगर-बीड-परळी रेल्वेची ६१ किमी स्पीड ट्रायलला सुरवात

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेची ६१ किमी स्पीड ट्रायलला सुरवात

Published by :
Published on

विकास माने, बीड

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील सोलापूर वाडी ते आष्टी या दरम्यान रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षापासून हे काम अखंडपणे सुरु होते. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील ६१ किमी पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर हायस्पीड ट्रायल घेतली जात आहे.

बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते. या परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर कामाने वेग घेतला. यामुळे आष्टी पर्यंतची रेल्वेचे कामे पूर्ण झाली आहे. एकूण 61 किलोमीटर अंतराचा असलेला हा टप्पा पूर्ण केला.

या मार्गावर सोलापूरवाडी हे स्टेशन तयार करण्यात आले आहे. येथून दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी मनोज अरोरा यांच्या हस्ते या स्टेशनवर पूजा करण्यात आली. त्यानंतर या संपूर्ण 61 किमी अंतराच्या तपासणीस सुरुवात झाली यासाठीची मोठी रेल्वे या रुळावर धावली. अधिकारी संपूर्ण रुळाची, पुलांची आणि सर्वांची पाहणी केल्यानंतर आष्टी येथून या हाय स्पीड ट्रायल ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित असणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com