चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीला सुरुवात

चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीला सुरुवात

Published by :
Published on

प्रतिनिधी : अनिल ठाकरे
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्ह्यात आज 100 हून अधिक विदेशी आणि देशी दारू दुकानांना परवाने वितरित करण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाने हे परवाने दिल्यानंतर देशी आणि विदेशी दारू दुकानदारांनी आपल्या दारू साठ्याची बुकिंग करत आज दुपारपासून हा दारूसाठा वितरित करण्यास सुरुवात केली आहे. यात पहिली बाजी मारली आहे ती तेलंगणा सीमेवरील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील देशी दारू दुकानान. यानंतर आता जिल्ह्यातील 100 हून अधिक बार-रेस्टॉरंट व देशी-विदेशी दारू दुकानांमध्ये दारू विक्रीला प्रारंभ झाला आहे. मद्य शौकिनांनी यासाठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील 100 हून अधिक बार-रेस्टॉरंट व देशी-विदेशी दारू दुकानांमध्ये दारू विक्रीला प्रारंभ झाला आहे. मद्य शौकिनांनी यासाठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com