Rohit Pawar
महाराष्ट्र
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल; कारण काय?
आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
(Rohit Pawar) आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलाकेंद्रातील गोळीबार प्रकरणी बदमानी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, प्रवक्ते विकास लवांडे, रविकांत वर्पे यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.
शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांची सोशल मीडियामधून झालेल्या बदनामी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
काल पुण्यातील दौंड कलाकेंद्रात एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केला असल्याची घटना घडली होती त्यानंतर खातर जमा न करता विरोधकांकडून बदनामी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. बदनामी करणाऱ्या विरुद्ध शंभर कोटीचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे कटके यांनी म्हटले आहे.