Congress
Congress

Congress : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेसचे एक दिवसाचे शिबिर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

(Congress ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसचे एक दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरात मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात

यासोबतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पवन खेरा, मुंबई काँग्रेसचे खजिनदार आमदार अस्लम शेख, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, निरंजन टकले, अशोक वानखेडे, राम पुनियानी हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या शिबिरातून काय मार्गदर्शन करण्यात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summery

  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेसचं एक दिवसीय शिबिर

  • शिबिर ‘लक्ष्य 2026’ मालाडमध्ये पार पडणार

  • शिबिराला रमेश चेन्नीथला यांची प्रमुख उपस्थिती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com