Congress
Congress

Congress : Satara Female Doctor case : डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसच्यावतीने आज मुंबईत आंदोलन

वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचाही काँग्रेसचा इशारा
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत आंदोलन

  • डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी आंदोलन

  • वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचाही काँग्रेसचा इशारा

(Congress) सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या घटनेत धक्कादायक बाब समोर आली असून, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावरच मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोन व्यक्तींची नावे लिहिली.

मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, "PSI गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला". त्या महिला डॉक्टरने या दोघांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

या घटनेनं राज्यात खळबळ उडाली. अनेक ठिकाणी संपडा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसच्यावतीने मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता गिरगांव चौपाटी येथे हे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते सहभागी होतील.

यावेळी वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे. काँग्रेसच्या होणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com