Congress : काँग्रेसचा आज ईडी कार्यालयावर धडक मोर्चा; नॅशनल हेराल्ड प्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Congress) नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरमध्ये गांधी कुटुंबासह सॅम पित्रोदा , सुमन दुबे, यंग इंडियन आणि इतरांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाने नकार दिल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली पोलिसांनी गांधी कुटुंबासह इतरांविरुद्ध याच प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरची प्रत त्यांना देण्यासही कोर्टाने नकार दिला असल्याची माहिती मिळत आहे.
कोर्टाच्या या निर्णयामुळे आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण सात जणांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ईडी कार्यालयावर काँग्रेस आज धडक मोर्चा काढणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सोनिया गांधी आणि राहुल गांधी व काँग्रेस पक्षाला नॅशनल हेराल्ड प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून नाहक त्रास दिला यावरुन काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले असून बदनामी केली पण न्यायालयाने निकाल देऊन भाजपाचा बुरखा फाडला आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीच्या कार्यालयावर मुंबई काँग्रेस आज दुपारी 1 वाजता मोर्चा काढणार आहे. या मोर्चात सर्व पदाधिकारी , जिल्हा अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील.
Summery
काँग्रेसचा आज ईडी कार्यालयावर धडक मोर्चा
भाजपने राहुल गांधी, सोनिया गांधींना नाहक त्रास दिल्याच्या विरोधात मोर्चा
नॅशनल हेराल्ड प्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक
